|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » लातूरमध्ये एस.टी.बसचा अपघात ; 14 जखमी

लातूरमध्ये एस.टी.बसचा अपघात ; 14 जखमी 

ऑनलाईन टीम / लातूर

लातूर जिह्यातील निलंगा-औसा या महामार्गावर उमरगा-लातूर या एसटीचा अपघातात झाला आहे. या अपघातात तब्बल चौदा प्रवासी जखमी झालेत. औसा ते लामजना पाटी दरम्यान असलेल्या फत्तेपुर पाटीजवळ हा अपघात झाला आहे.

जलद वेगात निलंग्याच्या दिशेने जाणाऱया आयशर टेम्पोची आणि एस.टी. बसची धडक झाल्याने हा अपघात झाला. असे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, बस ड्रायव्हरने टेम्पो भरधाव वेगात येत असल्याचे पाहून बस ही थांबवली. पण आयशर टेम्पोचालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा टेम्पो चालवण्यावरून ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो थेट एसटीवर धडकला. ही धडक इतकी भीषण होती की बसमधील पन्नास पैकी चौदा प्रवासी गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

Related posts: