|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » सरस्वती मालिकेला नाटय़मय वळण

सरस्वती मालिकेला नाटय़मय वळण 

 कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सरस्वतीच्या मफत्यूनंतर वाडय़ामध्ये बऱयाच घटना घडल्या ज्याला प्रेक्षक देखील साक्षीदार आहेत. त्यानंतर सरस्वतीसारख्या दिसणाऱया मुलीला म्हणजेच दुर्गाला विद्युल आणि भुजंगने वाडय़ामध्ये आणणे, सरस्वतीचे मालिकेमध्ये परतणे, राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणे हे सगळे घडत असतानाच सरस्वतीला असणारा आजार राघवला कळणे या सगळय़ाच गोष्टी खूप आश्चर्यजनक होत्या. पण, आता मालिकेमध्ये अजून एक रंजक वळण येणार आहे. ज्यामध्ये दुर्गा नकारात्मक होणार असून राघव आपले प्रेम आहे याची कल्पना आल्याने ती सरस्वतीचा काटा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडे हिला अजून एका नव्या शेडमध्ये बघणे प्रेक्षकांसाठी सरप्राईजच असणार आहे. तेव्हा आता मालिकेमध्ये दुर्गा सरस्वतीचा काटा कसा काढेल? राघवला दुर्गाच्या मनामध्ये काय आहे हे कळेल का? सरस्वतीला हे कळल्यावर ती कशी या संकटाला सामोरी जाईल हे बघणे रंजक असणार आहे. सरस्वती संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

सरस्वती मालिकेमध्ये दुर्गाची एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून दुर्गाची भाषा, तिची बोलण्याची स्टाईल, सगळंच प्रेक्षकांना आवडत आहे. दुर्गाचं उद ग अंबे उद बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दुर्गाचा बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडत आहे. तिच्या प्रत्येक कारस्थानांना, चालींना दुर्गा उलटून लावत आहे. या सगळय़ा घटनांमध्ये प्रेक्षकांना अजून एक सरप्राईज मिळाले ते म्हणजे त्यांची लाडकी सरस्वती, मोठय़ा मालकांची सरू मालिकेमध्ये नुकतीच परतली. एकीकडे दुर्गा ही अत्यंत बिनधास्त आणि सरस्वती थोडी जपून वागणारी, दुसऱयांच्या मनाचा विचार करणारी अशी आहे. दुर्गाचा वाडय़ातील वावर खूपच बिनधास्त आहे. त्यामुळे मालिकेमध्ये एकप्रकारचे हलकेफुलके वातावरण तयार झाले होते. पण, आता दुर्गाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या नव्या आव्हानाबद्दल बोलताना तितिक्षा म्हणाली, एक कलाकार म्हणून माझी वेगवेगळी रूपं, भूमिकेमधील शेड्स दाखविण्याची उत्तम संधी मला सरस्वती या मालिकेने अनेकदा दिल्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे की, हीच मालिका करताना आता मला नकारात्मक भूमिका करण्याची संधी देखील मिळत आहे. डबल रोल आणि आता ही संधी नक्कीच आव्हानात्मक आहे. पण, मी नक्कीच ही जबाबदारी पूर्णपणे निभावण्याचा मनापासून प्रयत्न करेन.