|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » मनोरंजन » दीर्घांकांचे रंगणार एकत्रित प्रयोग

दीर्घांकांचे रंगणार एकत्रित प्रयोग 

एकांकिकांचे एकत्रित प्रयोग मराठी रंगभूमीवर आता होऊ लागले आहेत. त्यात आता भर पडते आहे ती दीर्घांकांच्या एकत्रित प्रयोगाची. संपूर्ण नाटय़कृतीची अनुभूती देऊ शकेल असा दीर्घांक त्याच्या गोळीबंद प्रयोगासह सादर करणे हा उद्देश त्यामागे आहे. निखळ विनोद करणे आणि तो सशक्तपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तशी कठीण गोष्ट आहे. मात्र, ही गोष्ट लीलया साध्य करत प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या उद्देशाने अस्तित्व आणि इप्रोव्हायझेशन मुंबई प्रस्तुत, 30 सेकंड मीडिया फेब्रुवारीला रात्री 8 वाजता, दादरच्या शिवाजी मंदिर इथे सादर होणार आहेत.

 लेखक विनोद हडप यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली च टा टो अर्थात चटईला टाचणी टोचली हा दीर्घांक दिग्दर्शक प्रमोद शेलार सादर करणार असून  विविध स्पर्धांमध्ये या दीर्घांकाने अनेक पारितोषिकांवर मोहर उमटवली आहे. निर्माता संघाच्या दीर्घांक स्पर्धेत लक्षणीय यश मिळवलेल्या विनोद जाधव आणि विशाल कदम लिखित विनोद जाधव दिग्दर्शित हाऊसगुल या दीर्घांकाचे नुकतेच पुनरुज्जीवन करण्यात आले असून तो यंदाच्या काळा घोडा महोत्सवात विशेष लोकप्रिय नाटय़प्रयोग ठरला.

हेमंत साठे आणि दीपेश मलबारी यांची निर्मिती असलेल्या या प्रयोगांची प्रस्तुती  दर्जेदार नाटय़कृती सातत्याने प्रेक्षकांसमोर आणणारी अस्तित्व ही नाटय़संस्था करत आहे. हे निख्खळ मनोरंजन करणारे प्रयोग प्रेक्षकांच्या निश्चितच पसंतीस उतरतील, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

Related posts: