|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » पंजाबच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी व्यंकटेश प्रसाद यांची निवड

पंजाबच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी व्यंकटेश प्रसाद यांची निवड 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी आयपीएलच्या 11 व्या हंगामासाठी भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांची किंग्ज इलेवन पंजाबच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वीच प्रसाद यांनी 19 वर्षाखालील भारतीय संघाच्या निवड समितीचा राजीनामा देत आयपीएलमध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. यानंतर, रविवारी पंजाब संघव्यवस्थापनाने संघाच्या इतर प्रशिक्षकांची नावे जाहीर केली. प्रसाद यांच्यासहित ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉजची आगामी तीन वर्षासाठी पंजाब संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, विरेंद्र सेहवाग संघाच्या पंजाब संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी असणार आहे. याशिवाय, दिल्लीचा माजी रणजीपटू मिथुन मन्हास सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. प्रसादच्या नियुक्तीने पंजाब संघातील खेळाडूंना फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया सेहवागने यावेळी दिली. पंजाब संघातील या अमुलाग्र बदलामुळे आगामी 11 व्या हंगामात संघाची कामगिरी कशी होते, हे पहावे लागणार आहे.