झोका खेळतांना फास लागून मुलाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नाशिक
झोका खेळतांना गळय़ाला फास लागून चिमुरडय़ाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वर तालूक्यात घडली आहे.
उमेश मनोहर कुवर (वय 12 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. झोका खेळत असतांना त्याचा तोल केला आणि दोरीला फास बसला. त्यानंतर उमेशला तातडीने रूग्णालयात नेले असता, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.