|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणणार : अजित पवार

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणणार : अजित पवार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडणार असून त्यांना त्या पदावरून दूर करण्यात यावे,अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. विधान परिषदेतील सभागृह नेते चंद्रकांत पाटील सदस्यांचा अंगावर धाऊन गेले, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

सोमवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मुद्यावरून शिवसेना व विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. गदारोळामुळे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.यानंतर कामकाज सुरू होताच विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या कथित ऑडियो क्लिपच्या मुद्यावरून गदरोळ झाला. शेवटी विधानसभ अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.