|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी

जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

समाजवादी पार्टीने अभिनेत्री जया बच्चन यांना राज्यसभेची पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जया बच्चन यांच्यासह उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. जया बच्चन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने राज्यसभेचं तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी जोरदार लॉबिंग केली होती. मात्र अग्रवाल यांचा पत्ता कापत पक्ष नेतृत्वाने जया बच्चन यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला.