|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाटय़दर्पण गायन स्पर्धेत तनिशा मावजेकर प्रथम

नाटय़दर्पण गायन स्पर्धेत तनिशा मावजेकर प्रथम 

वार्ताहर / पणजी

पणजी शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित नाटय़दर्पण कार्यक्रमात गायन स्पर्धेतील प्रथम बक्षीस तनिशा मावजेकर हिने पटकाविले. तिला रोख पाच हजार रुपये व फिरता स्मृती चषक प्राप्त झाला.

येथील आझाद मैदानावर शिमगोत्सव समितीने ‘नाटय़दर्पण’ या कार्यक्रमात अखिल गोवा पातळीवर नाटय़ संगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात एकूण 20 स्पर्धकांनी एकापेक्षाएक अशा संगीत नाटकातील गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यात प्रवीण शिलकर (द्वितीय) 3500 रुपयांचे रोख बक्षीस तर सर्वेश फडते यांनी 2500 रुपयांचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. उत्तजेनार्थ बक्षीसे अनुक्रमे केदार डिचोलकर, दृशल च्यारी व दशरथ परब यांना प्राप्त झाली.

गायकांना नावाजलेले गोमंतकीय वादक दयेश कोसंबे (तबला), व राया कोरगावकर यांनी (हार्मोनियम) साथसंगत केली. स्पर्धेचे परीक्षण सारेगमप फेम समिक्षा भोबे काकोडकर व आकाशवाणी कलाकार राजेंद्र नाईक यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना परीक्षकांनी बक्षिसे प्रदान केली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, पदाधिकारी शांताराम नाईक, संदीप नाईक उपस्थित होते.