|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाक, बांगलादेश सीमेवर तंत्रज्ञानाचा वापर

पाक, बांगलादेश सीमेवर तंत्रज्ञानाचा वापर 

तंत्रज्ञानाच्या मदतीने ठेवली जाणार नजर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक के.के. शर्मा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या सीमेला पुढील 3-5 वर्षांमध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा कचव पुरविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

भारत-बांगलादेशच्या सीमा क्षेत्रात कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम (सीआयबीएमएस) बसविण्याची बीएसएफची योजना आहे. बांगलादेश सीमेवर दुर्गम भाग असल्याने काही ठिकाणी कुंपण उभारणे शक्य नाही. तेथे तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून यामुळे सीमेवरील घुसखोरी आणि तस्करी रोखण्यास मदत होणार असल्याचे शर्मा म्हणाले.

सीमेवर तांत्रिक रुपाने देखरेखीसाठी अनेक प्रकारची गॅजेट्स आणि तंत्रज्ञानाचे एकीकृत रुप ‘सीआयबीएमएस’ असून यात सीमा चौक्यांवर मॉनिटर बसविले जाणार आहेत. या मॉनिटर्समुळे बीएसएफ जवानांना सीमेला लागून असलेल्या क्षेत्रातील प्रत्येक हालचालीची माहिती मिळत राहणार आहे.

Related posts: