|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बिलासह इतर समस्या सोडविण्यासाठी शेतकऱयांचे निवेदन

बिलासह इतर समस्या सोडविण्यासाठी शेतकऱयांचे निवेदन 

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकऱयांची ऊस बिले, पीक विमा, पाणी समस्या, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे, या मागणीसाठी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱयांची ऊस बिले सौभाग्यलक्ष्मी साखर कारखाना व शिवसागर साखर कारखान्याने दिली नाहीत. 2013-14-15-16 या तीन वर्षांची बिले मिळाली नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. तेव्हा तातडीने ही बिले द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱयांच्या ऊस बिलाला किमान 3100 रुपये दर द्यावा, असा आदेश दिला आहे. तरीदेखील तो आदेश पाळला जात नाही. एक प्रकारे हा न्यायालयाचा अवमान असून तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

शेतकऱयांनी मोठय़ा आशेने 2017 साली पीक विमा भरला होता. मात्र, त्याची रक्कम अद्याप शेतकऱयांना देण्यात आली नाही. शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान होऊनदेखील विमा मिळत नसेल तर या योजनेचा काय फायदा? असा सवालही उपस्थित करण्यात आला. जिल्हाधिकाऱयांनी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. याच बरोबर जोंधळय़ाला प्रतिटन किमान 3 हजार दर द्यावा, याच बरोबर सर्वच तालुक्मयांमध्ये खरेदी केंदे स्थापन करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

सध्या अनेक गावांना पाणी समस्या भेडसावू लागली आहे. यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याच बरोबर चाराही कमी झाला असून तातडीने चारा विक्री केंदे सुरू करावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रवी सिद्धम्मन्नावर, राजू लगोटी, मल्लाप्पा मंडेद, गुरुलिंगय्या पुजार, बाळप्पा चळकोप्प यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

Related posts: