|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावात राधा के संग गीतों के रंग मैफीलीस उत्स्फूर्त दाद

तासगावात राधा के संग गीतों के रंग मैफीलीस उत्स्फूर्त दाद 

 

प्रतिनिधी/ तासगाव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तासगाव नगरपरिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने खास तासगाव शहरास परिसरातील महिलासाठी आयोजित करण्यात आलेल्या भारताची गायकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांची भाची  आणि संगीतकार पंडीत ऱहदयनाथ मंगेशकरांची कन्या सुप्रसिध्द पार्श्वगायिका राधा मंगेशकर यांच्या राधा के संग .. गितों के रंग… या मराठी-हिंदी गीतांच्या सुरेख मैफीलीस रसिक श्रोत्यानी उत्स्फूर्त दाद दिली. तर महिलांनी महिलासाठी भव्य असा आयोजित केलेला हा तासगावातील पहिलाच कार्यक्रम होता.

तासगावातील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या याकार्यक्रमास वैजयंता फौंडेशनच्या अध्यक्षा ज्योतीकाकी संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काकींनी उपस्थित सर्व महिलाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांच्या अडी-अडचणी सोडवण्यास आम्ही कटिबध्द आहोत असे सांगीतले. तसेच खास महिलासाठी आयोजित करण्यात आलेला राधा के संग.. गीतों के रंग… हा कार्यक्रम खुपच सुंदर असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले.

या कार्यक्रमास तासगाव शहरासह परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. तर यावेळी प्रमुख गायिका राधा मंगेशकर यांनी झालेल्या मराठी-हिंदी गीतांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे आयोजन करुन तो यशस्वी करण्यासाठी उपनगराध्यक्षा दिपाली पाटील, महिला व बालकल्याण सभापती रोहिणीताई शिरतोडे, नगरसेविका सुनंदाताई पाटील, पुनमताई सुर्यवंशी, मंगलकाकी मानकर, रुपाली गावडे, सारिका कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी जिल्हा दक्षता समिती सदस्य सरिता लांडगे, नगरसेविका निर्मला पाटील  आदी उपस्थित होते.

Related posts: