|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जीएमआर कंपनीच्या आश्वासनानंतर मोपाचे काम पुन्हा सुरु

जीएमआर कंपनीच्या आश्वासनानंतर मोपाचे काम पुन्हा सुरु 

प्रतिनिधी / पेडणे

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम शनिवारी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी आपल्या समर्थकांना घेऊन बंद पाडले होते. मात्र सोमवारी दुपारी आपल्या मोजक्याच समर्थकांना घेऊन श्रीफळ वाढवून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी जी.एम. आर कंपनीचे मुख्याधिकारी आर. व्ही. सेशन, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद वायडरकर, माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू, वारखंडचे सरपंच मंदार परब, कोरगावचे पंचसदस्य रंगनाथ कशालवकर, कुस्तान कुयेलो, उपसरपंच उदय पालयेकर, स्थानिक पंच प्रदीप कांबळी, सुशांत मांद्रेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग परब, धारगळचे पंचसदस्य प्रदीप पटेकर, आदी उपस्थित होते.

त्यावेळी बाबू आजगावकर यांनी सांगितले की, मोपासाठी ज्या शेतकऱयांच्या जमिनी गेल्या त्यांना प्रथम नोकरी तसेच झळ बसलेल्या प्रत्येक गावातील लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. यावर विश्वास ठेऊन काम करायला मोकळीक दिली आहे. मात्र कंपनीने पुन्हा विश्वासघात केला तर पुन्हा आंदोलन घेतले जाईल असा इशारा दिला. महिन्याभरामध्ये जे काम झाले त्याची माहिती स्थानिक आमदाराला देण्यात येणार आहे.

यावेळी कंपनीचे मुख्य अधिकारी आर.व्ही. सेशन आणि मिलिंद वायडरकर यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम पुढे नेणार असे सांगितले.

Related posts: