|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भांडण सोडविताना पोलीस जखमी

भांडण सोडविताना पोलीस जखमी 

प्रतिनिधी/ बेळगाव

दोघा जणांचे भांडण सोडविताना झालेल्या धक्काबुक्कीनंतर दगडावर पडून पोलीस जखमी झाला आहे. बुधवारी रात्री खडक गल्ली येथे ही घटना घडली असून या संबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मल्लाप्पा भीमाप्पा अक्कोळी (वय 55) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. खासगी इस्पितळात उपचार करुन त्याला रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली असून डॉक्टरांनी टाके घातले आहेत.

घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी आर. आर. कल्याणशेट्टी, पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी व त्यांचे सहकारी खडक गल्ली परिसरात दाखल झाले. रक्तबंबाळ अवस्थेतील पोलिसावर सुरुवातीला खासगी इस्पितळात उपचार करुन रात्री त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

या प्रकरणी खडक गल्ली येथील अमित जाधव या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास छाया दर्शीनी हॉटेलसमोर अमित व आणखी एकाचे भांडण सुरु होते. या परिसरात कर्तव्यावर असलेल्या मल्लाप्पा अक्कोळी या पोलिसाने भांडण विकोपाला जावू नये यासाठी हस्तक्षेप केला.

भांडण सोडविताना एकाने पोलिसाला धक्काबुक्की करुन त्याचे पाय ओडल्याने दगडावर पडून डोक्मयाला जबर दुखापत झाली. या संबंधी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांच्याशी संपर्क साधला असता दोघा जणांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविताना ही घटना घडली असून पोलिसाला धक्काबुक्की करणाऱयांविरुध्द एफआरआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: