|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » सलमानखानच्या कार्यक्रमाला स्पीकरची परवानगी देऊ नका- नगरसेवकाची मागणी

सलमानखानच्या कार्यक्रमाला स्पीकरची परवानगी देऊ नका- नगरसेवकाची मागणी 

ऑनलाईन टीम / पुणे

अभिनेता सलमान खानच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, अशी मागणी स्थानिक नगरसेवकाने पोलिसांकडे केली आहे.

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होवू नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. येत्या शनिवारी पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सलमान खान यांचा ‘दबंग टूर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी 55 डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा लाऊड स्पीकर बसवण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असे पत्र नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला दिले.

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असल्या, तरी पाचवी ते नववीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे ध्वनीक्षेपकाला परवानगी नाकारावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना केली आहे.