|Monday, December 10, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानची शहरातून आज मुकपदयात्रा

शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानची शहरातून आज मुकपदयात्रा 

प्रतिनिधी/ सातारा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी एक महिनाभर अतिक्रुर अत्याचार सहन करून फाल्गुन अमावास्येला बलिदान पत्करले. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर त्यांच्या देहाचे तुकडे करून औरंगजेबाने ते वढू गावच्या शिवारात फेकून दिले होते. त्यांची अंत्ययात्रा सुद्धा निघू शकली नाही. हिंदू धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. त्या काळी निघू न शकलेल्या अंत्ययात्रेच्या स्मरणार्थ मुकपदयात्रा गावोगावी काढत असतो. या वर्षी सातारा शहराची मुकपदयात्रेचा प्रारंभ मोती चौक येथून आहे. मुकपदयात्रा शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मोती चौक येथून सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे सतीश ओतारी यांनी दिली.

Related posts: