|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गावठी दारूसाठीचे 15 लाखाचे साहित्य जप्त

गावठी दारूसाठीचे 15 लाखाचे साहित्य जप्त 

उत्पादन शुल्क विभागाची मिरजोळेत कारवाई

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री घालण्यात येणाऱया गस्तीदरम्यान मिरजोळे-पाटीलवाडी येथे शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत 15 लाखाचा गावठी दारूसाठी लागणारा मुद्देमाल जप्त केल़ा यामध्ये सुमारे 7 हजार किलो काळ्य़ा गुळाचा समावेश असून या प्रकरणी तिघाजणाना अटक करण्यात आली आह़े

जयदीप दिलीप पाटील (37, ऱा जाखिणवाडी त़ा कऱहाड, ज़ि सातारा), मिलिंद रामचंद्र चव्हाण (31,ऱा गोपाळ वस्ती, त़ा कऱहाड, ज़ि सातारा) व शामराव सुभाना जाधव (42, वडगाव त़ा हातकलंगणे ज़ि कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गावठी दारूसाठी लागणाऱया साहित्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होत़ी त्यानुसार शनिवारी मिरजोळे-पाटीलवाडीकडून करबुडे जाणाऱया रस्त्याशेजारील गणेश विसर्जन घाटाजवळ नदीकिनारी गस्तीवर असणाऱया विभागाच्या कर्मचाऱयांना सहा चाकी आयशर कंपनीचा टेम्पो आढळून आल़ा

 त्याची झाडाझडती घेतली असता आतमध्ये काळ्य़ा गुळाच्या ढेपी असल्याचे कर्मचाऱयांच्या निदर्शनास आल़े या बाबत टेम्पोचालक जयदीप पाटील याच्याकडे गुळाची वाहतूक करण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच गाडीच्या रजिस्ट्रेशनबाबत देखील त्याने काहीही बोलण्यास नकार दिल़ा यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्यासोबत असणाऱया अन्य दोघा संशयितांना ताब्यात घेवून शेजारी असलेल्या विसर्जन घाटाजवळ छापा मारला. यामध्ये गावठी दारूसाठी लागणारे साहित्य आढळून आल़े

त्यांच्याकडून उत्पादन शुल्क विभागाने 10 किलो मापाच्या 680 व 5 किलो वजनाच्या 36 काळ्य़ा गुळाच्या ढेपी असा मिळून 7 हजार किलो गुळ (अंदाजे किंमत 2 लाख 80 हजार), 11 लाख 38 हजार किंमतीचा आयशर टेम्पो, दोन हजार किंमतीची ताडपत्री, 40 हजार किंमतीचे गुळवणमिश्रित भरलेले 9 प्लास्टिक बॅरेल, दोन लोखंडी पत्र्याचे बॅरेल, 20 मिली मापाचा गावठी हातभट्टी दारूने भरलेल एक प्लास्टिक पॅन, दोन ऍल्युमिनियम डेचके, दोन लाकडी चाटू स्टील पाईप इत्यादी मुद्देमाल हस्तगत केला आह़े या प्रकरणी तिघाही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम 1949 चे कलम 70, 72, 65, 80, 81, 83, 90 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Related posts: