विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई
मुंबईत ऍप्रेंटिसच्या उमेदवारांकडून रेल रोको करण्यात आला. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईकरांची तब्बल साडेतीन तास रेलबंदी केल्यानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ऍप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको पुरतास मागे घेतला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली, असल्याची मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माहिती दिली. याशिवाय पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अगोदर अप्रेंटिस भरतीसाठी दहा टक्के आरक्षण होते, ते वाढवून वीस टक्के करण्यात आले. मात्र, आरक्षण हे शंभर टक्के असावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
रेल्वे ऍप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्या काय आहेत ?
– 20 टक्के कोटा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.
– रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामाविष्ट करण्यात यावे.
– रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोटय़ाअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावे, भविष्यातही नियम लागू ठेवावा.
– याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये.