आमची चूक झाली, मार्क झुकरबर्गचा माफीनामा

ऑनलाईन टीम / मुंबई :
सोशल मिडिया जायंट मानल्या जाणाऱया फेसबुकच्या विश्वासर्हतेला तडा गेला आहे. फेसबुकवरून माहिती लीक होणे ही मोठी चूक होती, अशी कबुली फेसबुकचा सर्वेसवा मार्क झुकरबर्गने दिली आहे. आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाउंटवरून मार्क झुकरबर्गने भलीमोठी पेस्ट शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
लोकांची माहिती नेमकी कशी लीक झाली, नेमक्मया कुठे त्रुटी राहिल्या, याच शोध घेऊ आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाहीही त्याने दिली आहे. फेसबुकचा वापर हा अधिकधिक रंजक व्हावा, त्यावर वेगवेगळे गोष्टी लोकांना मिळाव्यात, यासाठी फेसबुक वेगवेगळय़ा ऍप्स आणि कंपन्यांना फेसबुकमध्ये परवानगी देतं. मात्र अशाच ऍप्स आणि कंपन्यांमधून लोकांची वैयक्तिक माहिती लीक होत आहे. त्यामुळे तुम्ही-आम्ही देखील आता फेसबुकचा वापर करताना, त्यावरच्या एखाद्या ऍपचा उपयोग करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.