|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘गावशिवार’चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण

‘गावशिवार’चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण 

प्रतिनिधी /गारगोटी :

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे येथील राज्यस्तरीय गावशिवार साहित्य पुरस्काराचे वितरण जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. विजय निंबाळकर होते.

डॉ. गवस म्हणाले, आजचा काळ हा अघोषित आणीबाणीचा आहे. या काळाला समजून लेखकाने लिहिले पाहिजे. आजकाळ असे लिहा, तसे लिहा असे सांगणारा वर्ग दिसतो आहे. झुंडीच्या झुंडी लेखकावर तुटून पडतात. अशावेळी त्या विरोधाला पचवून लिहायला हवं. जेव्हा लेखकाला मंचाची नशा चढून सारखे इकडे-तिकडे टाळय़ा शोधत मजा वाटते. तेव्हा लेखक संपला असे समजावे. लेखकाला काळाचे भान असले पाहिजे. तसेच समाजाला विचार प्रवृत्त करायला लावता येणारे लेखन झाले पाहिजे.

यावेळी मुख्य पुरस्कार रावसाहेब कुवरöसाक्रीधुळे (कविता), रचना-अहमदनगर (कांदबरी), रेणू पाचपोर-परभणी (बालसाहित्य), शिल्पा सावंत-ठाणे (कथा), विशेष पुरस्कार बाळासाहेब लबडे-गुहागर (कविता), प्रतिक पटेल-कोल्हापूर (कांदबरी), विनोद तिरमारे (कथा), किरण चव्हाण-पांगिरे (बालसाहित्य) आदींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

स्वागत प्रास्ताविक गावशिवारचे संकल्पक गोविंद पाटील यांनी केले. समारंभास सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक संपत गायकवाड, अरण्यवाचक व्ही. डी. पाटील, बाळ पोतदार, गझल गायक प्रल्हाद जाधव, नरेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, कोजिमाशिचे चेअरमन हिंदुराव पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक बँक संचालिका लक्ष्मी पाटील, मारूती मांगोरे, चंद्रशेखर कांबळे, टी. एस. गडकरी, स्नेहल कुलकर्णी, संजय खोचारे, रविंद्र गुरव, प्रकाश केसरकर, प्रा. उदय शिंदे, प्रा. सुधीर गुरव यांच्यासह ग्रामीण साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. सुत्रसंचालन कवी सुनिल पाटील यांनी केले. आभार प्रा. शिवाजी देसाई यांनी मानले.

Related posts: