|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » भिडेंच्या समर्थनार्थ 28 मार्चला राज्यभर सन्मान मोर्चा

भिडेंच्या समर्थनार्थ 28 मार्चला राज्यभर सन्मान मोर्चा 

ऑनलाईन टीम / पुणे :

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक व्हावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेलया एल्गार मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भिडे समर्थकांकडून संभाजी भिडे सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या एल्गार मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी 28 मार्चला संभाजी भिडे समर्थकांकडून सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख शहरात भिडे समर्थक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. भिडेंविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले जाणार आहे.

भिडेंच्या सन्मानात या शहरात निघणार मोर्चे

 • बेळगाव – श्रीसंभाजी महाराज चौकापासून ते बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • जळगाव – शिवतीर्थ चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 9 वाजता.
 • सांगली – राजमतीभवन नेमिनाथरावपासून ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • कोल्हापूर – बिंदू चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • नाशिक – अनंत कान्हेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 9 वाजता.
 • गोंदीया – श्रीशिवप्रतिष्ठाण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 11 वाजता.
 • सातारा – राजवाडापासून ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • सोलापूर – चार पुतळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • पुणे – लाल महालापासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • यवतमाळ – बसस्थानकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.
 • मुंबई – भायखळापासून ते आझाद मैदानापर्यंत, वेळ सकाळी 10 वाजता.