|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अगोदर झाली तणातणी शेवटी लागीर झालं जी

अगोदर झाली तणातणी शेवटी लागीर झालं जी 

प्रतिनिधी/ सातारा

भर गर्दीत वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांना विविध अनुभवास सामोरे जावे लागते. काही वेळा भांडणाचे प्रसंगही उभे ठाकतात.  प्रसंग असाच एका प्रसिध्द मालिकेच्या अभिनेत्याच्या बाबतीत घडला. तेव्हा मग वाहतूक पोलिस आणि अभिनेत्यात तू तू मैं मैं झाली. मात्र, नंतर जेव्हा दोन्ही बाजूंनी एकमेकांची खरी परिस्थिती कळल्यावर मने जुळली आणि शेवटी लागीर झालं जी…. असेच म्हणावे लागले.

दोन तीन दिवसांपूर्वी लागीर झालं जी मालिकेतील शीतलच्या काकाची भूमिका साकारणारे अभिनेते व निर्माते धोंडीबा कारंडे कामानिमित्त साताऱयात आले होते.  काम आटोपून ते आपल्या गाडीतून चालले असताना त्यांना वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी संदीप वाघमारे व धीरज महाडिक यांनी अडवले. त्यांच्याकडे लायसन, कागदपत्रांची मागणी करु लागले. त्यावेळी धोंडीबा कारंडे यांनी ते लागीर झालं जी मालिकेतील अभिनेते असल्याचे सांगितले मात्र मालिका पाहण्यासही वेळ नसलेले वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांनी त्यांना ओळखले नाही. त्यातून मग शब्दाने शब्द वाढत गेला आणि अभिनेता आणि पोलिस यांच्यात तू तू मैं मैं झाला होती. त्यामुळे एकेमेकांच्या मनात शब्द तसेच राहिले होते.

नंतर एकमेकांची ओळख पटत गेली. वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि अभिनेते धोंडीबा कारंडे तरुण भारतच्या कार्यालयात आले. त्यावेळी झालेल्या घटनांचा उहापोह झाला. मात्र, शेवटी एकमेकांच्या मनातील गैरसमज दूर होवून वाहतूक शाखेचे कर्मचारी संदीप वाघमारे, धीरज महाडिक आणि लागीर झालं जी च्या काकांमध्ये मैत्रीचे धागे जुळले. शेवटी लागीर झालं जी… असं म्हणत तरुण भारतच्या कार्यालयात वाहतूक पोलिस देखील अभिनेत्याच्या प्रेमात पडून गळाभेट घेवू लागले तेव्हा समजावून घेतले तर प्रेम वाढते याचा प्रत्यंतरच आले.