|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » क्रिडा » व्हर्डेस्को, व्हेरेव्ह, किरगॉईस, अझारेंका विजयी

व्हर्डेस्को, व्हेरेव्ह, किरगॉईस, अझारेंका विजयी 

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा व्हर्डेस्को, जर्मनीचा ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह, ऑस्ट्रेलियाचा किरगॉईस यांनी चौथ्या फेरीत स्थान मिळविले. बेलारूसची अझारेंका तसेच स्विटोलिना, व्हिनस यांनी एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. व्हर्डेस्को आणि कोकिनाकिस यांच्यात तिसऱया फेरीतील सामन्यावेळी शब्दिक चकमक उडाली.

तिसऱया फेरीतील झालेल्या सामन्यात स्पेनच्या फर्नांडो व्हर्डेस्कोने कोकिनाकिसचा 3-6, 6-4, 7-6 (7-4) अशा सेटस्मध्ये पराभव केला. सुमारे तीन तास चाललेल्या या लढतीतील तिसऱया सेट अखेर उभयतामध्ये जोरदार शब्दिक चकमक उडाली. मास्टर्स 1000 एटीपी टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कोकिनाकिसने टॉप सीडेड स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करताना तिसऱया आणि शेवटचा टायब्रेकरमधील सेट जिंकला. तथापि व्हर्डेस्कोविरूद्धच्या सामन्यात टायब्रेकरमधील तिसऱया आणि शेवटच्या सेटमध्ये कोकिनाकिसने लाईन कॉलबद्दल कोर्टवरील पंचांकडे तक्रार केली पण पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर व्हर्डेस्कोबरोबर त्याची शब्दिक चकमक उडाली, या सामन्यानंतर व्हर्डेस्कोने कोकिनाकिसशी हस्तांदोलन करून यावर पडदा टाकला.

तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या 20 वर्षीय ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने स्पेनच्या डेव्हिड फेररचे आव्हान 2-6, 6-2, 6-4 असे संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली. व्हेरेव्हचा चौथ्या फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसशी होईल. निक किरगॉईसने तिसऱया फेरीतील सामन्यात इटलीच्या फॉगनेनीचा 6-3, 6-3 असा पराभव केला. व्हर्डेस्कोचा चौथ्या फेरीतील सामना स्पेनच्या बुस्टाशी होईल. 16 व्या मानांकित बुस्टाने तिसऱया फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचा 6-4, 6-4 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने कॅचेनोव्हचा 4-6, 6-2, 6-3, बल्गेरियाच्या शेपोव्हॅलोव्हने अमेरिकेच्या सॅम क्वेरीचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.

महिलांच्या एकेरीतील सामन्यात अमेरिकेच्या वयस्कर व्हिनस विलीयम्सने माजी विजेती जोहाना कोंटाचा 5-7, 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने पोलंडच्या ऍग्नेझिका रॅडव्हेन्स्कावर 6-2, 6-2 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. अझारेंकाने हा सामना 82 मिनिटात जिंकला. झेकच्या 28 वर्षीय कॅरोलिना प्लिसकोव्हाने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविताना कझाकस्तानच्या झरिना दियासचा 6-2, 2-1 असा पराभव केला. दुखापतीमुळे दियासने हा सामना अर्धवट सोडला. अमेरिकेच्या स्लोनी स्टिफेन्सने स्पेनच्या मुगुरूझाचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. जर्मनीच्या केर्बरने चनीच्या येफेनचा 6-7 (1-7), 7-6 (7-5), युक्रेनच्या स्विटोलिनाने ऑस्टेलियाच्या बार्टीचा 7-5, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Related posts: