|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हर हर महादेवाच्या जयघोषात भक्ताने मुंगी घाट केला सर

हर हर महादेवाच्या जयघोषात भक्ताने मुंगी घाट केला सर 

प्रतिनिधी / माळशिरस / नातेपुते

हर हर महादेवाच्या जय घोषात शिवभक्तानी मानाच्या कावडीसह मुंगी घाट चढून शिंगाणापूरमध्ये प्रवेश केला. अत्यंत अवघड ह्रदयाचे ठोके वाढविणारा मुंगी घाटातील कावडी सोहळा पाहण्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासूनच घाटाच्या पायथ्याशी व मुंगी घाटाच्या वरच्या कडावर भाविकभक्ताने मोठी गर्दी केली होती.

  दुपारी साडे तीन वाजता तेली भुतोजी या मानाच्या कावडीने सातारा जिह्यातून सोलापूर जिह्यात कोथळे तालुका माळशिरसच्या ओढय़ामध्ये प्रवेश केला. यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, पंचायत सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी सुरेश मारकड, मंडळ अधिकारी गुडनाळे, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, यू.डी. मस्के तलाठी, उदगावे तलाठी, सरपंच ग्रामस्थांनी कावडीने स्वागत केले.

  याठिकाणी तेल्या भुतोजी व कोथळे गावच्या कावडीची भेट पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक हजर होते. स्वागतानंतर तेली भूतोजी कावड व कोथळे गावची कावड यांची भेट झाली. त्यांनतर हा कावडी सोहळा मुंगी घाटाकडे मार्गस्थ झाला. बरोबर सव्वा पाच वाजता वाटाडय़ा म्हणजे आंद्रडची कावड व तेल्या भुतोजी कावड मुंगी घाटाच्या पायथ्याशी पोहचली. त्यांनतर पूजा व आरती झाल्यानंतर वाटाडय़ा म्हणजे आंद्रडची कावड मुंगी घाटाला लागली सव्वापाच वाजता मानाची कावड तेली भुतोजी कावडीने मुंगी घाट चढण्यास प्रारंभ केला. यावेळी हर हर महादेवाच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सव्वा सातच्या सुमारास मानाच्या कावडीने शिंगणापूर मध्ये प्रवेश केल्यांनतर मोठय़ा आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.

     प्रशासन सतर्क

मुंगी घाटाच्या पायथ्याला तहसीलदार बाई माने व त्याचे सहकारी आपत्कालीन काही घडल्यास ताक्ताळ मदत करण्यासाठी सतर्क होते. तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानेही सर्व भाविक भक्तांना सुविधा पुवाण्यासाठी कर्मचारी यंत्रणा सज्ज ठेवली होती. आपत्कालीन उपाय योजनेसाठी प्रशासन सज्ज होते, पोलीसे यंत्रणाही सज्ज होती.