|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मानाच्या कावडीचे फलटणमध्ये स्वागत

मानाच्या कावडीचे फलटणमध्ये स्वागत 

प्रतिनिधी/ फलटण

शिखर शिंगणापूरच्या मोठय़ा महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी मंगळवारी येथून शिखर शिंगणापूरकडे रवाना झाल्या, त्यावेळी शासनाच्या वतीने या कावडींचे यथोचित स्वागत करण्यात आले. 

याप्रसंगी तहसीलदार विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाविकांनी या कावडींचे व त्यासोबत असणाऱया मानकऱयांचे स्वागत करुन दर्शन घेतले. सासवड जि. पुणे येथील भुतोजीबुवा तेली या कावडीचे व त्यासोबत असणाऱया मानकऱयांचे प्रामुख्याने कैलास कावडे, सुनिल कावडे, जयवंत जगताप, संग्राम पाटील, नगरसेवक प्रवीण भोंडे यांचे स्वागतही तहसीलदार विजय पाटील यांनी केले. मुंगी घाटातून या सर्व कावडी बुधवारी सायंकाळी शिखर शिंगणापूर डोंगर पठारावर पाहोचल्या. दरम्यान, मानकरी तसेच राज्यातील कावडीधारकांचा श्री. छ. राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, ग्रामपंचायत शिखर शिंगणापूर बडवे समाज व ग्रामस्थांतर्फे या सर्व कावडींचे स्वागत करण्यात आले.

 

Related posts: