|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Automobiles » ऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच

ऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार कंपनी ऑडी कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई ट्रॉन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचे प्रोडक्शन मॉडेल 30 ऑगस्ट 2018रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

कंपनीने या गाडीचे मॉडेल 2018 जिनेवा मोटर शोमध्ये सादर केले होते. जर्मन कार निर्माता कंपनीने घोषणा केली आहे की ,जर्मनीत यांची किंमत 80,000यूरो म्हणजे जवळपास 64.08 लाख रूपयेपासून सुरू होणार आहे. ऑडी कंपनीने ई-ट्रॉन इलेक्ट्रिक एसयुव्ही युरोपियन बाजारात 2018च्या शेवटपर्यंत लाँच करणार आहे. त्यानंतर 2019पर्यंत इतर बाजारात लाँच करण्यात येणार आहे.ही कार भारतीय बाजारपेठेत लवकरच लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण , ऑडीने भारतात ई ट्रॉनचे यापूर्वीच रजिस्टर्ड केले आहे.