|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ट्रक्टर-दुचाकी अपघातात एक ठार

ट्रक्टर-दुचाकी अपघातात एक ठार 

वार्ताहर /मणेराजुरी :

कुमठा फाटय़ाजवळ उसाने भरलेल्या ट्रक्टरला एम-80 या मोटारसायकची जोरदार धडक होऊन कुमठे येथील एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे. कुमठे गाव ते फाटा या रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सांगलीकडे जाणारा उसाने भरलेल्या ट्रक्टरला समोरून येणाऱया एमएटीची ( एमएच 07 डी 72 40 )जोरदार धडक बसली. टॅक्टरच्या मोठय़ा चाकाला धडकून मोटारसायकलवरील दोघे जण उडून डांबरीला पडले. यामध्ये लालासो तमण्णा जाधव ( वय 50 ) हे जागीच ठार झाले. तर शशिकांत विश्वनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मिरजेच्या मिशन हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. एमएटीवरील दोघे जण फाटीवरुन कुमठेकडे परतत होते. या घटनेची तासगाव पोलिसात नोंद झाली असून दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Related posts: