|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींविरोधातील वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात याचिका

मोदींविरोधातील वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात याचिका 

वृत्तसंस्था/ गोरखपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना भोवणार असल्याचे दिसत आहे. ही याचिका येथील भाजप प्रवक्ते शलभ त्रिपाठी यांनी दाखल केली. उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल झाली असून 5 एप्रिल रोजी सुनावणी आहे. नवी दिल्ली येथील नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदी नाव भ्रष्टाचाराला पर्यायी नाव असल्याचे म्हटले होते. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी व पंजाब नॅशनल बँक घोटाळय़ातील नीरव मोदी यांच्याशी तुलना केली होती. यामुळे भाजप सदस्यांसह संपूर्ण भारतीयांच्या भावनेचा अपमान केल्याचे याचिकेत म्हटले आहे.