|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सध्याच्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल

सध्याच्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल 

प्रतिनिधी/ म्हसवड

आज शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत, परंतु या बदलाला सामोरे जाण्याकरिता सर्वच शिक्षकांनी आपल्यात बदल घडवणे आवश्यक आहे आणि तो बदल आज दिसून येत आहे. आज जिल्हा परिषद  शाळांचे चित्र बदलत चालले असून याचे सर्व श्रेय शिक्षकांचेच आहे. तुमच्या परिश्रमामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचे प्रतिपादन  जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ यांनी केले.   

जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अंतर्गत म्हसवड शाळा नं. 3 बालआनंद मेळावा,  बनगरवाडी  (ता. माण) येथे नुकताच पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सदस्या सोनाली पोळ, पालिका पाणीपुरवठा सभापती सविता म्हेत्रे, पंचायत समिती सभापती रमेश पाटोळ,  उपसभापती नितीन राजगे, नगरसेविका हिंदमालादेवी राजेमाने, नगरसेविका मनिषा विरकर, नगरसेवक केशव कारंडे, डॉ. वसंत मासाळ, शिक्षण  विस्तार  अधिकारी  संगीता गायकवाड, केंद्र प्रमुख दारासिंग निकाळजे,  संचालक राजाराम खाडे, विधाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन नवगण,  परेश व्होरा, अहमद मुल्ला, प्रवीण भोते, शहाजी अवघडे, सत्यवान मदने, माजी नगरसेवक रामचंद्र मदने यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

 पोळ पुढे म्हणाल्या, मुलांनी अभ्यासाबरोबरच इतर खेळांत सहभाग घेतला पाहिजे, याकरिता बाल आनंद मेळावा निधीत वाढ करण्यात आली असल्याचेही  त्यांनी याप्रसंगी आवर्जुन सांगितले. यावेळी सभापती  रमेश पाटोळे, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे, डॉ. वसंत मासाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी अहिल्याबाई होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीमंत खाडे, शिक्षक सौ. कुंभार,  एस. के. सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नरळे, केंगार यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मोरे व कैलास तोरणे यांनी केले.

Related posts: