|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » सोलापूरच्या प्रा.अनिल घोलप यांना अर्थशास्त्रात पीएचडी

सोलापूरच्या प्रा.अनिल घोलप यांना अर्थशास्त्रात पीएचडी 

ऑनलाईन टीम /  पुणे:

प्रा. अनिल त्रिंबक घोलप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

प्रा. घोलप यांनी ‘इम्फॅक्ट ऑफ ट्रायबल एज्युकेशन प्रमोशनल स्किम्स ऑन सोशो-इकोनॉमिक्स डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल पिपल इन महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू ठाणे डिस्ट्रिक्ट’ (2001 -2010) या विषयावर प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना दिंडोरी, नाशिकचे अर्थशास्त्र विभागप्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. सुनील उगले यांनी मार्गदर्शन केले. प्रा. घोलप यांनी त्यांच्या संशोधनामध्ये आदिवासी शिक्षण योजना आदिवासी लोकांकरिता कशाप्रकारे उपयुक्त ठरत असून, त्याद्वारे आदिवासी लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात कशाप्रकारे भर पडली, हे अधोरेखित केले आहे. तसेच आदिवासी शिक्षण योजनांचा लाभ घेताना आदिवासी लोकांना येणाऱया अडचणी व योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनाला येणाऱया अडचणी यांचा विस्तृत अभ्यास करून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. प्रा. अनिल घोलप हे सध्या संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य डी. डी. पुजारी, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गौतम दळवी तसेच सहकारी प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.