|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » सोलापुरसह कोल्हापुरला पावसाने झोडपले

सोलापुरसह कोल्हापुरला पावसाने झोडपले 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

राज्यातील विविध भागात पावसाने गारांसह हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहराला पावसाने झोडपून काढले आहे, तर जोरदार गारा पडल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पाऊस झाला. तर सोलापुरातही पावसाने हजेरी लावली.

सोलापूर विद्यापीठ परिसरात काही वेळ पाऊस झाला. राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असताना अचानक आलेल्या या पावसाने सोलापूर आणि कोल्हापूरकरांना उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळाला. यापूर्वी राज्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाचे वातावरण दिसताच शेतकऱयांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून नुकसान टाळता येईल.

 

Related posts: