|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘मरिन सिंडिकेट’तर्फे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा

‘मरिन सिंडिकेट’तर्फे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

देशभर 5 एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मरिन सिंडिकेटतर्फे स्वयंवर मंगल कार्यालयात राष्ट्रीय सागरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने समुद्रीय वस्तूंचे प्रदर्शन आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. गेली 28 वर्षे मरिन सिंडीकेट हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करत आहे. यंदाही या दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मरिन सिंडिकेटचे मरिनर दिलीप भाटकर व सहकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.

5 एप्रिल 1919 रोजी 99 वर्षांपूर्वी एस.एस. लॉयल्टी या पहिल्या भारतीय व्यापारी जहाजाने विदेश प्रवास पूर्ण केला होता. यानिमित्ताने हा राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येऊ लागला. यंदा सागरी दिनानिमित्त आयोजित रत्नागिरीतील प्रदर्शनात मच्छिमारी व्यवसायाशी संबंधित लाँच, त्यावरील साहित्य, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त साधनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच डॉ. स्वप्नजा मोहीते यांनी संशोधित केलेल्या समुद्रीय स्पंजबाबतचे संशोधन मांडण्यात आले होते.