|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रशियाकडून लढाऊ विमान खरेदीच्या प्रयत्नात पाक

रशियाकडून लढाऊ विमान खरेदीच्या प्रयत्नात पाक 

इस्लामाबाद :

 भारत स्वतःची सैन्यसज्जता भक्कम करण्यासाठी पाच एस-40 क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालींच्या खरेदीसाठी रशियासोबत चर्चा करत आहे. तर आता शेजारी देश पाकिस्तान देखील स्वतःच्या संरक्षणसामग्रीत भर टाकण्याच्या धोरणावर काम करत आहे. यानुसार पाकने उत्कृष्ट सैन्य हार्डवेअरच्या खरेदीसाठी रशियासोबत चर्चा सुरू केली आहे. या हार्डवेअरमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा, लढाऊ विमान आणि युद्धरणगाडय़ांचा समावेश
आहे.  4.5 अब्ज डॉलर्स मूल्याचा भारताचा रशियासोबतच संरक्षण व्यवहार किमतीमुळे प्रलंबित आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी रशिया दौऱयावेळी या व्यवहारावर सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर पाकिस्तानी संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी रशियाच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इस्लामाबाद, मॉस्कोकडून शस्त्रास्त्र खरेदीस इच्छुक असल्याचे सांगितले.

हवाई सुरक्षा यंत्रणा वेगळय़ा प्रकारचे शस्त्र असून ते खरेदी करण्यास आम्ही इच्छुक आहोत. आम्ही व्यापक पल्ल्याची रशियन शस्त्रास्त्रs मिळविण्यास अत्यंत उत्सुक आहोत. दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून ती पूर्ण झाल्यावर याची आम्ही याबद्दल घोषणा करू असे दस्तगीर म्हणाले.

पाकिस्तान रशियाकडून टी-90 रणगाडा खरेदी करू इच्छितो. दीर्घावधीच्या खरेदीचा हा भाग आहे. एसयू-35 च्या खरेदीबद्दल देखील रशियासोबत चर्चा सुरु आहे. यावर पुढील वर्षी करार होण्याची शक्यता असल्याची माहिती दस्तगीर यांनी दिली. भारत मागील दीड वर्षांपासून एस-400 च्या खरेदीबद्दल वाटाघाटी करत आहे. ही प्रणाली तीन विविध प्रकारची प्रक्षेपास्त्र डागू शकते. अशा प्रकारे या यंत्रणेमुळे तीन स्तरीय सुरक्षा कवच प्रदान होते.