|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » इंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत

इंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत 

प्रतिनिधी मुंबई

‘शिकारी’ या चित्रपटाच्या ट्रेलर किंवा गाण्यांमधून आतापर्यंत बोल्ड सीन्स आणि विनोदी ढंग दिसला आहे. पण हा चित्रपट हसवता हसवता अंतर्मुख करणारा आहे. शिकारी जंगलामध्ये रात्रीच्या वेळी शिकार शोधत असतो. पण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकारांचा गैरफायदा घेणारे शिकारी राजरोसपणे फिरत आहेत असे मत निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. शिकारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा मंगळवारी सिटीलाईट चित्रपटगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने, प्रमुख कलाकार नेहा खान, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, कश्मिरा शहा उपस्थित होते. महेश मांजरेकर यांनी शिकारीची प्रस्तुती केली आहे.

शिकारीचा विषय वेगळा आणि मस्त होता. त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णत: व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश द्यायचा आहे. तुम्हाला आणि विशेषत: मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपणाने वावरू नका, असे महेश मांजरेकर म्हणाले. शिकारीचे दिग्दर्शक विजू माने म्हणाले की, स्त्राrत्वाचा गैरफायदा घेणाऱया श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 20 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

गाजलेली मराठी मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला आणि स्वत:चे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत आणि नेहा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून चित्रपटसफष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मिरा शहा, मफण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकुर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा दांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

Related posts: