|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यात चोरी, दोन लाख लंपास

पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यात चोरी, दोन लाख लंपास 

प्रतिनिधी/ बार्शी

शहरातील उपळाई रस्त्यावरील टेलिफोन नगरमधील साई-कृष्ण निवास हा केज (ता. बीड) येथील पोलीस निरीक्षकांचा बंगला फोडून सुमारे 2 लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला असून बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी बार्शी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांची पत्नी व मुलगी 2 एप्रिल रोजी शाळेला सुट्टी लागल्यामुळे केज येथे गेले होते. 9 एप्रिल रोजी घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले.

बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोथंडा तोडून चोरटय़ांनी प्रवेश केला. लोखंडी कपाट, लाकडी कपाट तोडून चार तोळय़ाचे गंठण, एक तोळय़ाचे मंगळसूत्र, अर्ध्या किलोचा, चांदीचा तांब्या, तीन चांदीचे पैजण, 50 हजार रू. चा एलएडी टीव्ही शोकेसमधून काढून घेऊन गेले. असा सर्व मिळून दोन लाखाचा मुद्देमाल चोरटय़ांनी पळवला आहे.

शेजाऱयांनी तसेच कामवाला बाईनेही चोरी 9 एप्रिल रोजी मध्यरात्री झाली असलयाचे सांगितले. चोरटय़ांनी गेटच्या दरवाज्याचे कुलूप तसेच ठेवून भिंतीवन उडय़ा मारून आल्याचे दिसले पोलिसांना अद्याप काहीही धागेदोरे मिळले नसून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शमीम शेख करीत आहेत.