|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » हैद्राबाद-कोलकाता यांच्यात आज लढत

हैद्राबाद-कोलकाता यांच्यात आज लढत 

वृत्तसंस्था/ कोलकाता

11 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. हैद्राबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आपले पहिले दोन्ही सामने जिंकुन आता ते विजय घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करतील. कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सनरायझर्स हैद्राबादने नेट रनरेटवर पहिले स्थान मिळवले असून चेन्नई सूपर किंग्ज दुसऱया स्थानावर आहे. शनिवारचा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने कोलकाता संघाला त्याचा अधिक लाभ मिळू शकेल. यापूर्वीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 200 पेक्षा अधिक धावा करूनही त्यांना चेन्नई संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. केन विलियम्सनच्या नेत्तृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबादचा संघ इतर संघांच्या तुलनेत निश्चितच समतोल वाटतो. या संघामध्ये अनुभवी फलंदाजांची फळी तसेच भेदक गोलंदाजांच्या समावेशामुळे या संघाने आतापर्यंत सलग दोन सामने जिंकले आहेत. गुरुवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात हैद्राबाद संघाने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासातील हा पहिला क्षण आहे. मुंबई संघाने 8 बाद 147 धावा जमवल्यानंतर हैद्राबाद संघाने शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला. कर्णधार विलियमसन, शिखर धवन, मनिष पांडे, साहा हे या संघातील महत्त्वाचे फलंदाज आहेत. गेल्यवर्षीच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला इडन गार्डन्सवर 17 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत त्या दोन संघामध्ये 12 सामने झाले आहेत. मिचेल जॉन्सनचे पुनरागमन होत असल्याने कोलकाता संघाची गोलंदाजी अधिक भक्कम होईल. दिनेश कार्तिककडे कोलकाता संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. कर्णधार कार्तिक, सुनिल नरेन, आंद्रे रसेल, उथप्पा यांच्यावर कोलकाता संघाच्या फलंदाजीची भिस्त राहिल. हा सामना शनिवारी रात्री 8 वाजता सुरू होईल.

Related posts: