|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » मध्य आणि हार्बर मार्गावर  आज मेगा ब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर  आज मेगा ब्लॉक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने, रविवारी सकाळी 10.48 ते दुपारी 4.14 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱया सर्व धिम्या, अर्धजलद लोकल फेऱया, कल्याण ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तसेच, सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱया सर्व डाउन जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

 

 

 

 

Related posts: