|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » ईपीएफ वेतनमर्यादा वाढविण्याचा निर्णय लांबणीवर

ईपीएफ वेतनमर्यादा वाढविण्याचा निर्णय लांबणीवर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संघटित क्षेत्रातील साठ लाख कर्मचाऱयांना भविष्यनिर्वाह निधीचा लाभ देण्याचा प्रस्ताव सरकारकडून लांबणीवर टाकण्यात आला. सरकारी तिजोरीवरील भार वाढणार असून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. सध्या मासिक 15 हजार रुपये वेतन असणाऱया कर्मचाऱयांना ईपीएफचा लाभ घेता येता. ही मर्यादा वाढवित 21 हजार करण्याचा कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव होता. या श्रेणीतील कर्मचाऱयांना पीएफ आणि निवृत्तीवेतनाच्या सेवा देण्याचा सरकारचा विचार होता.

मंत्रालयाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यास अतिरिक्त खर्चात वाढ होईल. मात्र या प्रस्तावावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात न आल्यास कामगार संघटना सरकारविरोधात देशभर आंदोलन करतील अशी शक्यता आहे. आपल्या मंत्रालयाकडून कोणताही प्रस्ताव नसल्याचे कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटले. ईपीएफसाठी वेतनमर्यादा वाढविण्यात आल्यास सरकारी तिजोरीवर प्रतिवर्षी 3 हजार कोटी रुपयांचा भार पडेल.

Related posts: