|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » मान्सूनच्या सरासरीच्या अनुमानाने बाजारात सरी

मान्सूनच्या सरासरीच्या अनुमानाने बाजारात सरी 

बीएसईचा सेन्सेक्स 112, एनएसईचा निफ्टी 47 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात सलग आठव्या सत्रात तेजी दिसून आली. नोव्हेंबरनंतर प्रथमच बाजारात दीर्घ काळ खरेदी झाली. मायक्रो इकोनॉमिक डेटा आणि भूराजकीय तणाव स्थिर राहणार असल्याने सेन्सेक्स 112 उंचावत बंद झाला.

अमेरिकेने सीरियावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने आसियाई बाजारात काही प्रमाणात मिश्र स्वरुपाचे संकेत दिसून आले. यामुळे भारतीय बाजाराने कमजोर सुरूवात केली होती, मात्र दिवसअखेरीसपर्यंत तेजी आली. महागाई घसरली आणि औद्योगिक उत्पादनात वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने बाजारात खरेदी झाली. काही कंपन्यांकडून मार्च तिमाहीचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष्य आता त्याकडे आहे. चालू वर्षात मान्सून 97 टक्के होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

34 हजारचा टप्पा गाठत गेल्या काही दिवसात बीएसईचा सेन्सेक्स 33,899 पर्यंत घसरला होता. मात्र विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू झाल्याने दिवस अखेरीस 112 अंकाने वधारत 34,341 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 47 अंकाने मजबूत होत 10,528 वर स्थिरावला.

बीएसईच्या रिअल्टी निर्देशांकांत चांगलीच तेजी दिसून आली असून 1.82 टक्के, आरोग्यसेवा 1.11 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.96 टक्के, ऊर्जा निर्देशांक 0.67 टक्के, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र 0.52 टक्क्यांनी वधारला. घसरलेल्या निर्देशांकात आयटी 0.78 टक्के, आयटी 0.69 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 0.21 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.14 टक्क्यांनी कमजोर झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

हीरो मोटो 0.02 टक्के आणि कोटक बँक 1.88 टक्क्यांनी वधारले. याव्यतिरिक्त अदानी पोर्ट्स 1.85 टक्के, बजाज ऑटो 1.73 टक्के, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1.66 टक्के, एनटीपीसी 1.55 टक्के, आयटीसी 1.42 टक्के, एशियन पेन्ट्स 1.30 टक्के आणि सन फार्मा 1.26 टक्क्यांनी वधारले. घसरलेल्या समभागात टाटा मोटर्स 4.96 टक्क्यांनी कमजोर झाला. लॅण्डरोव्हरकडून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विक्री झाली. याव्यतिरिक्त इन्फोसिस 3.10 टक्के, एसबीआय 0.76 टक्के, ओएनजीसी 0.55 टक्के, टाटा स्टील 0.49 टक्क्यांनी कमजोर झाले.

Related posts: