|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुमदुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर

दुमदुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर 

प्रतिनिधी/   संकेश्वर

‘जय भवानी जय शिवाजी’च्या अखंड जयघोषात संकेश्वरात मंगळवारी शिवज्योतीचे आगमन झाले. सकाळी 8 वाजता येथील शंकरलिंग भवनात सज्जनगड, भुदरगड, सिंधुदुर्ग, रत्नदुर्ग, विजयदुर्ग येथून आणलेल्या शिवज्योतीचे आगमन झाले. आगमनाप्रसंगी जि. पं. सदस्य पवन कत्ती, माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, श्रीकांत हतनुरे यांच्या हस्ते शिवज्योतीला पुष्पहार अर्पण करुन जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करीत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. तसेच ज्योत आणलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मिठाई वाटप करण्यात आले.

सकाळी 9 वाजता शंकरलिंग भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीला नगराध्यक्षा धनश्री कोळेकर व सिमा हतनुरे यांनी चालना दिली. ही मिरवणूक कित्तूर चन्नमा सर्कल, शिवाजी चौक, सुभाष रोड, खाटीक गल्ली, मड्डी गल्ली, नेहरु रोड, नदी गल्ली, मठगल्ली, गांधीचौकमार्गे शांतवाडय़ातील भवानी मंदिरात पोहोचली. शहरातील सर्वच मार्गावर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. पालखी मिरवणुकीत भगव्या पताकासह धनगरी ढोल, झांजपथक व जयघोषाने आसंमत दणाणला होता.

जन्मकाळ साजरा

दुपारी 12 वाजता भवानी मंदिरात प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष संजय शिरकोळी यांनी करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सजविलेल्या पाळण्यात शिवरायांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. सुवासिनींनी विविध पाळणे सादर केले.

कार्यक्रमास नगराध्यक्षा धनश्री कोळेकर, नगरसेविका सविता सावंत, सिमा हतनुरे, अरुणा कुलकर्णी, अमृता मुळे, सीमा रेळेकर, मनिषा शिवणे, लक्ष्मी कोळेकर, पूजा कोळेकर, अनुराधा देसाई, वैशाली मोहिते, संगीता सूर्यवंशी, शोभा मोकाशी, माधुरी मोकाशी, स्वाती पाटील, ललिता मोरे, विद्या मोकाशी, जयश्री केस्ती, रिना शिंत्रे, रंजिता कदम, अश्विनी केस्ती, जि. पं. सदस्य पवन कत्ती, माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, श्रीकांत हतनुरे, संजय शिरकोळी, नगरसेवक संजय नष्टी, दीपक भिसे, राजू बांबरे, बसवराज बागलकोटी, सुनील पर्वतराव, अभिजीत कुरणकर, नागेश क्वळ्ळी, कृष्णा सुगंधी, पुष्पराज माने, दिनेश कोळेकर, राजू जाधव, जयप्रकाश सावंत, संदीप दवडते, समिर पाटील, राजेश गायकवाड, राजू इंगळे, आनंद मोरे, आप्पा शिंत्रे, दत्ता शिंदे, संदीप गोंधळी, महादेव डावरे, गणेश कोळेकर, अभिजीत कुलकर्णी, आप्पा मोरे, सचिन मोकाशी, गिरीश कुलकर्णी, नेताजी आगम, महेश दवडते आदी. कार्यकर्ते उपस्थित होते. रविवार दि. 22 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिरवणुकीचे आयोजन नदी गल्लीपासून करण्यात आले आहे. असे जयप्रकाश सावंत यांनी सांगितले.

निपाणी परिसरात शिवजयंती उत्साहात

निपाणी : छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष, शिवप्रेमींचा सळसळता उत्साह, विविध देखावे, सजावट आदींच्या माध्यमातून निपाणी शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. शिवप्रेमींनी विविध गडांवरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी पाळणे गायिले. काही ठिकाणी बालचमूंनी शिवरायांची वेशभूषा केली.

येथील शिवाजी चौकात मध्यवर्ती शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सकाळी 9 वाजता श्रीमंत विजयराजे देसाई सरकार यांच्या हस्ते अभिषेक व पूजा पार पडली. यानंतर जिजामाता भगिनी महिला मंडळाच्या सदस्या व महिलांनी पाळणा गायिला. बाळासो घाटगे महाराज यांनी पौरोहित्य केले. यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवपुतळय़ास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार काका पाटील, प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, सभापती नितीन साळुंखे, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, नगरसेवक संजय सांगावकर, राजेंद्र चव्हाण, धनाजी निर्मळे, दिलीप पठाडे, अनिस मुल्ला, जयराम मिरजकर, गोपाळ नाईक, जयवंत भाटले, रमेश वैद्य, अनिल शिंदे, विकास वासुदेव, सुधाकर सोनाळकर, विजय टवळे, नम्रता कमते, किरण कोकरे, सचिन पोवार यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे, पांडुरंग भोई, विनायक वडे, सुनील शेलार, ओंकार शिंदे, विजय शेलार, महेश कांबळे, विनायक घोरपडे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related posts: