|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नवी दिल्लीत महिलेसमोरच उबेर चालकाचं अश्लील कृत्य

नवी दिल्लीत महिलेसमोरच उबेर चालकाचं अश्लील कृत्य 

नवी दिल्ली

 नवी दिल्लीत अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. प्रवासी महिलेसमोरच हस्तमैथुन करणाऱया उबेर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने विमानतळावर उबेर कॅब आरक्षित केली होती. रात्रीची वेळ पाहून चालकाने महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास प्रारंभ केला. रस्ता सामसूम असल्याने महिलेने त्यावेळी गप्प राहणे शेयस्कर मानले. काही अंतरावर पोलीस दिसल्यावर तिने चालकाला कॅब रोखण्याची सूचना केली. महिलेने पोलिसांच्या दिशेने धाव घेतली असता कॅबचालकाने तेथून पळ काढला. मात्र ऍपआधारित कॅब असल्याने महिलेकडे वाहनाचा क्रमांक असल्याने आरोपी सापडला आहे.

. या क्रमांकावरूनच दिल्ली पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून आरोपीला अटक केली. यानंतर दुसऱया दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.