|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मजरे कासारवाडय़ात बहरले सुर्यफूल

मजरे कासारवाडय़ात बहरले सुर्यफूल 

प्रतिनिधी/ सरवडे

मजरे कासारवाडा ता. राधानगरी येथील शेतकरी रघुनाथ तुकाराम वारके यांनी घेतलेले सुर्यफूल पिक बहरले असून या ठिकाणी बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी भेट देवून पाहणी केली आहे. तालुक्यात सुर्यफूलाची पेरणी केवळ भितीपोटी कमी झाली असताना राधानगरी तालुका संघाच्या मिश्रखताव्दारे या शेतकऱयाने अवघ्या 70 दिवसात सुर्यफूलाचे पिक चांगले आणले आहे.

वारके यांनी 20 गुंठे शेतामध्ये तीन सरीच्या अंतराने एक फूट अंतरावर सुर्यफूलाची टोकनणी केली आहे. उगवणीनंतर 21 व्या दिवशी राधानगरी संघाच्या 10:20:20 या ऊसछाप खताचा डोस दिला आहे. त्यानंतर तणनाशकाची एकदाच फवारणी केली. कोणतेही किटकनाशक अथवा औषधे न वापरता या सुर्यफूलाची वाढ समाधानकारक झाली असून समाधानकारक पिक घेतल्याने तालुक्यात पुन्हा सुर्यफूलाच्या पिकात वाढ होईल असा विश्वास यावेळी खोराटे यांनी व्यक्त केला. पाहणीवेळी निवृत्त शेती अधिकारी आर. बी. फराकटे, बी. टी. मुसळे, विलास काळुगडे आदी उपस्थित होते.