|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आत्माराम बांदेकर यांचे उपोषण स्थगित

आत्माराम बांदेकर यांचे उपोषण स्थगित 

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

पोलीस भरतीत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळविण्यासाठी आत्माराम बांदेकर यांनी मुंबई आझाद मैदान येथे सुरू केलेले उपोषण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. याप्रकरणी आपण चौकशी करतो, असे आश्वासन केसरकर यांनी बांदेकर यांना दिले.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन देखील आपणार डावलण्यात आल्याचा आरोप बांदेकर यांनी केला आहे. तसेच न्याय मिळविण्यासाठी त्यांनी यापूर्वी जिल्हय़ात अनेक आंदोलने केली होती. मात्र, आश्वासनांपलिकडे आपल्या पदरात काहीच पडत नसल्याचे सांगत त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाची माहिती मिळताच केसरकर यांनी तातडीने दखल घेत आपण याप्रकरणी जातीनीशी लक्ष घालतो, असे आश्वासन दिल्यानंतर बांदेकर यांनी उपोषण मागे घेतले.

Related posts: