|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » वेनगर यांचा व्यवस्थापकपदाचा राजीनामा

वेनगर यांचा व्यवस्थापकपदाचा राजीनामा 

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत अव्वल समजल्या जाणाऱया अर्सनेल संघाचे गेली 22 वर्षे संघ व्यवस्थापकपद यशस्वीपणे सांभाळणारे अर्सेनी वेनगेर यांनी व्यवस्थापकपदाचा राजीनामा देणार आहेत. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात वेनगेर हे सर्वात यशस्वी मॅनेजर म्हणून ओळखले जातात.

68 वर्षीय वेनगर यांनी ऑक्टोबर 1996 साली अर्सनेल क्लबच्या व्यवस्थापक पदाची सूत्रे हाती घेतली. अर्सनेलला 1228 सामन्यात त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. वेनगेर यांचा अर्सनेल क्लबबरोबरचा करार 2017 साली संपुष्टात येणार होता. पण अर्सनेलने त्यांच्या करारामध्ये दोन वर्षांची वाढ केली. चालू वर्षीच्या इंग्लिश प्रिमियर लिग फुटबॉल हंगामानंतर आपण संघ व्यवस्थापकपदाचा स्वखुषीने त्याग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेगनर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्सनेल क्लबने 1998 आणि 2002 साली इंग्लिश प्रिमियर लिग आणि एफ ए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती.

 

Related posts: