|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यशवंत भालकर यांची एकसष्टी झाडांच्या सानिध्यात

यशवंत भालकर यांची एकसष्टी झाडांच्या सानिध्यात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य यशवंत भालकर यांची एकसष्टी मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यांनीच लावलेल्या वृक्षाच्या सानिध्यात रंकाळा येथे गुलमोहर या मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे त्यांचा वाढदिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर हे आजही चित्रपट मालिकांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. याचबरोबर नुकतीच त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर निवड झाली आहे. कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीत ते सातत्याने कार्यरत असतात.

रंकाळ्यावर त्यांनी गेल्या सात वर्षात अनेक आरोग्यदायी झाडे लावली असून त्या झाडांच्या सानिध्यातच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गुलमोहर मॉर्निंग वॉक ग्रुपचे चंद्रकांत वडगांवर, डॉ. विनायक भोई, डॉ. महेश्वरी, उद्योगपती संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

Related posts: