|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या!

अजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या! 

दुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न

बेळगाव/ प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत म. ए. समिती उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी एकी महत्त्वाची आहे. एकीसाठी अनेक स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी एकीला बाधा आणणारे कोणतेही प्रकार करू नका. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही, एक व्हा. असे आवाहन शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी नगरसेवक तसेच मागील निवडणुकीच्या वेळच्या निवड समिती सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी एकीसंदर्भात आवाहन केले. तसेच दुफळीचा गैरफायदा घेण्यासाठी विरोधक टपले आहेत. याचे भान ठेवून जागरूक व्हा आणि एकत्र या असे आवाहन त्यांनी केले.

एकीचे प्रयत्न व्यर्थ जाऊ नयेत

विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवाराला प्रामाणिक मतदार आपले मत देऊन निवडून आणतात. जनसामान्यांमधून उमेदवाराची निवड करण्याची आजवरची परंपरा आहे. निवड समितीच्या माध्यमातून निष्पक्षपातीपणे उमेदवाराची निवड करून त्याला संधी देण्याचा विचार आजपर्यंत राबविण्यात आला आहे. एकी व्हावी यासाठी म. ए. समितीचे पाईक बनून कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, असे असताना एकीचे प्रयत्न व्यर्थ जाऊ नयेत याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावा, त्या करिता आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित राहण्यास तयार आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले.

म. ए. समितीच्या उमेदवार निवडीसंदर्भात झालेल्या प्रत्येक चर्चेच्यावेळी तसेच बैठकांच्यावेळी एकीचा आग्रह सामोरा आला आहे. मात्र या बैठकांच्या फलनिष्पत्तीचा विचार करता एकीसाठी अद्याप वेळ गेलेली नाही. त्यामुळे आता एकत्र येणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

बैठकीत चर्चेत शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील, मनपातील गट नेते पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाक, सतिश तेंडोलकर, किरण गावडे, संजय मोरे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांच्यासह इतर सदस्यांनी भाग घेतला. 

Related posts: