|Sunday, August 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दृढ मैत्रीसाठी हिंदी-मँडरिन शिका!

दृढ मैत्रीसाठी हिंदी-मँडरिन शिका! 

चीनमध्ये विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचा ‘मैत्रीमंत्र’

वृत्तसंस्था/ बीजिंग

शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी चीन दौऱयावर असणाऱया विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी भारत आणि चीनच्या नागरिकांना दोन्ही देशांच्या दृढ संबंधांसाठी परस्परांची भाषा शिकण्याची सूचना केली. ‘भारत आणि चीनच्या मैत्रीत हिंदीचे योगदान’ या विषयावरून प्रसारमाध्यमांना संबोधित करत स्वराज यांनी संपर्क अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या भाषा जाणून घेण्यावर भर दिला आहे.

आमचे संबंध दृढ होत असल्याने सर्व चिनी विद्यार्थ्यांनी हिंदी तर भारतीय विद्यार्थ्यांनी मँडरिन भाषा शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. चीनचे विद्यार्थी हिंदी भाषेवर प्रेम करतात, यामुळे दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत होण्यास मदतच होणार आहे. भारतीय चित्रपटांची येथील लोकप्रियता कौतुकास्पद असल्याचे उद्गार स्वराज यांनी काढले.

भारतीय चित्रपट वेगाने चीनमध्ये प्रसिद्धी मिळवत आहेत. दंगल, सिक्रेट सुपरस्टार आणि हिंदी मीडियम हे चित्रपट येथे अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. हिंदी शिकत असलेल्या चीनच्या 25 विद्यार्थ्यांना भारत दौऱयावर येण्याचे निमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

एका विद्यार्थिनीने भारताला भेट देण्याचे स्वप्न व्यक्त केले. तिचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. 25 विद्यार्थ्यांना भारत दौऱयावर पाठवा अशी सूचना भारतीय राजदूतांना केल्याची घोषणा स्वराज यांनी सोमवारी केली.

Related posts: