|Monday, January 21, 2019
You are here: Home » leadingnews » गडचिरोलीत 48 तासात 37 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीत 48 तासात 37 नक्षलवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / गडचिरोली :

गेल्या 48 तासात आतापर्यंत 37 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. इंद्रावती नदीत आणखी आकरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहे. देशाच्या इतिहासातील नक्षलवादी विरोधातील ही सगळय़ात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

नदीत आढळलेल्या अकरा नक्षलवाद्यांपैकी सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतरांचे मृतदेह काढण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांवर हल्ला चढवत पहिल्या कारवाईत 16 जणांचा खात्मा केला होता, या हल्ल्यात जखमी अवस्थेत पळून जात असलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह नदीत आढळले. गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठे ऑपरेशन पार पाडत काल, राजाराम खानाला परिसरात सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पडले. महत्त्वाचे म्हणजे, या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आले.

 

Related posts: