|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » शनिवारपासून बँकेला सलग चार दिवस सुट्टी

शनिवारपासून बँकेला सलग चार दिवस सुट्टी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

या महिन्याच्या शेवट सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ होण्याची शक्यता आहे. 28 एप्रिल,29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहे. शिवाय 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे.

सलगच्या चार सुट्टयामुळे ऐन लग्नसराईच्या काळात पैशांची चणचण भासू शकाते. त्यामुळे बँकेचे व्यवहार आटोपून घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस ग्राहकांच्या हातात आहे. 28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 (सोमवार) एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे (मंगळवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. या चार दिवसात आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

 

Related posts: