|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भरधाव कारच्या धडकेत एक जखमी

भरधाव कारच्या धडकेत एक जखमी 

वार्ताहर /मांगूर :

भरधाव कारच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची घटना कारदगा-बारवाड रस्त्यावर बारवाडनजीक गंगानगरमध्ये घडली. दाजी चौगुले असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.

गंगानगर येथील दाजी चौगुले हे आपल्या घरातून बारवाड गावात चालले होते. याचदरम्यान गळतगा येथील सुबान मुल्ला हे कार (एमएच 13 एन 1080) ने काही कामगार घेऊन एमआयडीसीला चालले होते. सध्या रस्ता चांगला करण्यात आल्याने सर्वच वाहने भरधाव वेगाने जात आहेत. भरधाव वेगाने जाणाऱया कारची चौगुले यांना जोराची धडक बसली. त्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. यात चौगुले यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांना कोल्हापूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या कार अपघातात कारच्या काचा फुटल्याने नुकसान झाले आहे.