|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती याशिर ठार

जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती याशिर ठार 

पुलवामा :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ातील त्राल भागात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर मुफ्ती याशिर  मारला गेला. जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक वैद यांनी ट्विरटवर गुरुवारी याची पुष्टी दिली. दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचा यासिर हा महत्त्वाचा सहकारी होता.

दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारावर मंगळवारी सुरक्षा दलांनी त्रालच्या जंगलात मोहीम राबविली होती. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी मारले गेले होते. ज्यात कमांडर मुफ्ती याशिरचा देखील समावेश होता. चकमकीच्या ठिकाणावरून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा सापडला होता. या चकमकीत सैन्याचे दोन जवान हुतात्मा झाले होते. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ात रविवारी सुरक्षा दलांनी एक दहशतवादी तळ नष्ट करत तेथून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs हस्तगत केली होती. हे दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते. गुप्त सूचनेच्या आधारावर सुरक्षा दलांच्या एका संयुक्त पथकाने हंदवाडाच्या वात्सर वनक्षेत्रात शोधमोहीम राबविली होती.

 

Related posts: